खानापूर : गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील सर्टीफायस्कूल जवळ उभारण्यात आलेल्या मलप्रभा क्रीडांगणाची दुरावस्था जशीच्या तशीच आहे. या मलप्रभा क्रीडांगणाचा कायापालट कधी होणार, अशी मागणी खानापूर शहरातील क्रीडा प्रेमीतून होताना दिसत आहे.
माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या काळात मलप्रभा क्रीडांगणाची उभारणी झाली. त्यांच्या काळात जो विकास झाला. तेवढाच विकास आजतागायत आहे.
कै. आमदार प्रल्हाद रेमाणी यांच्यानंतर माजी आमदार अरविंद पाटील आमदार झाले, त्यांच्यानंतर माजी आमदार अंजली निंबाळकर आमदार झाल्या. त्यांच्या काळात सुद्धा मलप्रभा क्रीडांगणाचा विकास झाला नाही. म्हणून खानापूर शहरातील एकुलते एक मलप्रभा क्रीडांगण आजतागायत सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे खानापूर शहरातील खेळाडूंना सरावासाठी कुठच क्रीडांगण नाही. अशामुळे खेळाडू तयार होण कठीण झाले आहे.
सध्या खानापूर तालुका मलप्रभा क्रीडांगणावर कोणतीच सोय नाही. धावपट्टी नाही. कोणत्याही खेळाचे ग्राऊंड नाही. पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही. शौचालयाची सोय नाही. दुसरीकडे पावसाळ्यात क्रीडांगणावर रान वाढुन जनावरे चरत असताना दिसतात.
आमदारांच्या काळात तालुका क्रीडांगणासाठी निधीच उपलब्ध झाला नाही. की आमदारांचे याकडे साफ दुर्लक्ष झाले. याचा शोध घेणे गरजेचे आहे.
लोकप्रतिनिधींनी अशा महत्वाच्या क्रीडांगणाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने तालुक्यातील खेळाडू नाराज झाले आहेत.
आता झालं गेलं गंगेला मिळालं असें समजुन तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी खेळांच्या प्रगतीसाठी क्रीडांगणाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करावा.
कारण नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर हे एक शिक्षक होते. त्यामुळे त्यांना खेळ आणि क्रीडांगणाचे महत्व इतरांपेक्षा अधिक असणार. तेव्हा खानापूर शहरातील मलप्रभा क्रीडांगणाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी सर्व थरातुन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta