खानापूर : खानापूर तालुक्यातील गुंडुपी गावातील सबा मुजावर नामक महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत तिची आई बसेरा साहेबखान यांनी नंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
सबा मुजावर हिला तिचा पती मुजाहिद्दीन मुजावर, सासरा शब्बीर मुजावर, सासू दिलाशाद मुजावर यांनी नीट स्वयंपाक येत नाही म्हणून त्रास देत होते. तिला कुठेही बाहेर जाऊ दिले जात नव्हते. या त्रासाला कंटाळून सबा हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तिने माहिती दिली.
नंदगड पोलिसांनी पती मुजाहिद्दीन मुजावर व सासरा शब्बीर मुजावर यांना अटक केली आहे. नंदगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta