खानापूर : हिरेकुडी (ता.चिकोडी) येथील नंदी पर्वत आश्रमाचे आचार्य कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येच्या निषेधार्थ गुरूवारी दि. १३ रोजी खानापूर तालुका हिंदु संघटनेच्या वतीने भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
प्रारंभी खानापूर शहरातील बाजारपेठेतील लक्ष्मी मंदिरापासुन भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा पणजी बेळगांव महामार्गावरील शिवस्मारक चौकात येऊन मानवी साखळी करून निदर्शने केली. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी तालुका हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यानी स्वामीच्या मारेकर्याना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. अशी मागणी केली.
यावेळी भाजप युवा नेते पंडित ओगले म्हणाले, जैन समाजाचे कामकुमार नंदी महाराज समाजाला प्रबोधन करणारे स्वामी अशा स्वामी क्रूरपणे तुकडे करून हत्या केली. अशा मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.
माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, समाजाला चांगले वळण लागावे म्हणून स्वतःचे आयुष्य घालवणारे तसेच अहिंसा वादी स्वामी यांची हत्या होते. अशा मारेकऱ्यांना कोणतीच दया न दाखवता त्याना सरकारने फाशीची शिक्षा केली पाहिजे. तरच देशात शांतता नांदेल. असे मत व्यक्त केले.
यावेळी बाबूराव देसाई, शरद केशकामत, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल, मल्लापा मारीहाळ, डी. एम. पाटील, अवरोळी मठाचे चनदेवरू स्वामी आदी शोक व्यक्त केला.
यावेळी ग्रेड टु तहसीलदार रमेश बुवा यांनी निवेदनाचा स्विकार करून निवेदन सरकारकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना भाजपचे मिडीया प्रमुख राजेंद्र रायका, भाजप नेते
प्रकाश निलजकर, बाळू सावंत, पंकज कुट्रे, किरण तुडवेकर, गजानन पाटील, उदय भोसले, संजय कंची, राजू रपाटी, विविध हिंदु संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर बजरंग दल कार्यकर्तेही उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta