Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर-बेळगाव सटल बस सुरू करा; खानापूर वकील संघटनेचा रस्ता रोको

Spread the love

 

खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील खानापूर मार्गे बेळगावला दररोज ५००० हून जास्त कॉलेज विद्यार्थी, शिक्षक व नोकरदार मंडळी खानापूरहून बेळगांव व बेळगांवहून खानापूर ये-जा करत असतात. वेळेत बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नोकरवर्गही वेळेत पोचू शकत नाही. प्रत्येक अर्ध्या तासाला बससेवा सुरू करा. या मागणीसाठी खानापूर वकिल संघटनेच्या वतीने शुक्रवारी दि. १४ रोजी सकाळी पणजी बेळगांव महामार्गावरील कोर्ट आवारा समोर रास्ता रोको करून खानापूर बस आगाराचे लक्ष वेधून घेतले.
तब्बल दोन तास रास्ता रोको केल्याने महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या रास्ता रोकोला खानापूर वकिल संघटनेचे अध्यक्ष ऍड. आय. आर. घाडी, माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील, भाजप नेते बाबूराव देसाई, सुभाष चलवादी, डाॅ. डी. ई. नाडगौडा, वकील उपस्थित होते.
यावेळी बोलताना खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. आय. आर. घाडी म्हणाले की, वेळोवेळी निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटून विनंती केली तरी के एस आर टी बेळगांव डेपो मॅनेजर, खानापूर डेपो मॅनेजर कोणतीही ठोस भुमीका घेत नसून आता रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही. म्हणून वकील संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला एक अशा प्रकारे शटल बस सेवा सुरू करा. विद्यार्थी वर्गाला जाण्यासाठी सोय होईल. अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थी वर्गाला येण्या-जाण्यास उशीर होत आहे. त्यातच उभे राहुन प्रवास केल्याने विद्यार्थी थकून जातात. त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होतो. तेव्हा सकाळी सहा ते अकारा वाजेपर्यंत व सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यत सटल बस प्रत्येक अर्ध्या तासाला सोडवी, अशी मागणी केली.

यावेळी खानापूर बस आगाराचे डेपो मॅनेजर यांना वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी, याच्या नेतृत्वाखाली डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांनी निवेदनाचा स्विकार करून विद्यार्थ्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले.
निवेदन देताना खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. आय. आर. घाडी, माजी आमदार अरविंद पाटील, वरिष्ठ वकील एच. एन. देसाई, चेतन मणेरीकर, गजानन देसाई, सादिक नंडगडी, जी. जी. पाटील, व्ही. एन. पाटील, सौ. राजेश्वरी हिरेमठ, मदन देशपांडे, राजू अंद्रादे, आय. बी. लंगोटी, विजय हिरेमठ, मारुती कदम, सुरेश भोसले, अरूण सरदेसाई, तसेच भाजपचे नेते बाबूराव देसाई, सुभाष चलवादी, दिलीप पवार, व बहुसंख्य वकील नागरीक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *