खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जत -जांबोटी महामार्गावरील जांबोटी क्राॅस येथे असलेल्या १६ गुंठे जमिनीवर खानापूर तहसील कार्यालयाने आपला हक्क बजावत तारेचे कुंपण घालून जागेचे संरक्षण केले.
गेल्या कित्येक वर्षांपासून जत -जांबोटी महामार्गावरील जांबोटी क्राॅसवर अनेक गाळे चालु होते. मात्र गेल्या वर्षी महामार्गावरील रस्त्याचे रूंदीकरण, गटारी व डांबरीकरण करण्याच्या उद्देशाने जवळपास ७० गाळेधारकांचे गाळे काढुन टाकण्यात आले व रस्त्याचे रूंदीकरण, गटारी व डांबरीकरण झाल्यानंतर गाळेधारकानी पुन्हा गाळे उभारले. मात्र मागील आठवड्यात तहसील कार्यालयाकडून पोलिस बंदोबस्तात गाळे काढुन टाकण्यात आले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून तहसील कार्यालयाच्यावतीने येथील १६ गुंठे जमिनीवर हक्क सांगत तारेचे कुंपण करण्याचे काम हाती घेण्यात आले.
गाळेदारकाना कोण दाताच नाही
जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर जवळपास ७० गाळेधारकानी गाळे उभारून आपला उदरनिर्वाह चालवत होते. मात्र त्याच्या गाळ्यावर जीसीपी फिरवून गाळे उध्दवस्त केले. मात्र ७० गाळेधारकाना कोणीच दाता नाही. यापुढे त्यानी आपला संसार कसा चालवायचा. असा प्रश्न गाळेधारकासमोर पडला आहे. तर दुसरीकडे तहसील कार्यालयाने १६ गुंठे जमिनीवर तारेचे कुंपण घालून आपली जागा काबीज केली.
Belgaum Varta Belgaum Varta