खानापूर : रामनगर -गुंजी रस्त्यालगत कचरावाहू डंपर पलटी झाल्याने गुंजी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रविवारी रात्री डंपर चालकाचा ताबा सुटल्याने कचरवाहू डंपर रस्त्याशेजारील विद्युत खांबाला धडकली व पलटी झाली. या धडकेत डंपर चालक सुदैवाने बचावला आहे. मात्र धडक दिल्यामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत व त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ याची कल्पना हेस्कॉमला दिली व विद्युत पुरवठा सुरळीत चालू केला. पण कचरावाहू डंपर पलटी झाल्यामुळे गावात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. डंपर पलटी झाल्यामुळे कचरा इतरत्र विखुरला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने सदर कचरा डंपर व रस्त्यात विखुरलेला कचरा तात्काळ हटवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta