खानापूर : खानापूर डाॅक्टर असोसिएशन हे १९९२ पासुन असुन यंदाच्या नुतन खानापूर डाॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी डाॅ. डी. ई. नाडगौडा यांची नुकताच निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ डाॅ. सुदर्शन सुळकर होते. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. असोसिएशनच्या सेक्रेटरी पदी डाॅ. सागर नार्वेकर, तर खजिनदार पदी डाॅ. किरण लाड यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना मावळते अध्यक्ष डाॅ. सुनिल पाटील म्हणाले की, खानापूर डाॅक्टर असोसिएशनची स्थापना १९९२ साली करण्यात आली. तेव्हा शहरासह तालुक्यातील डाॅक्टर असोसिएशनच्या माध्यमातून अनेक विविध कार्यक्रम राबविले आहेत. कोरोना काळात जनतेला धीर देण्याचे डाॅक्टर असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कोणतीच भिती न बाळगता डाॅक्टर रात्रंदिवस सेवेसाठी सज्ज होते. आज असोसिएशनच्या माध्यमातून सर्व डाॅक्टर एकत्र येतो. ही संघटना बळकट होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले.
यावेळी खानापूर डाॅक्टर असोसिएशनचे नुतन अध्यक्ष डाॅ डी. ई. नाडगौडा म्हणाले, खानापूर शहरासह तालुक्यातील डाॅक्टराना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डॉक्टर म्हणजे श्रीमंत माणूस असा समाजाचा समज आहे. आम्ही पैशासाठी कधीच डाॅक्टर पेशा करत नाही. पहिला रुग्णसेवा हे आमच ध्येय आहे. गरीबाकडुन पैसा मिळेल याची अशा करत नाही. डाॅक्टर असोसिएशनच्या माध्यमातून कार्यक्रम राबविण्याचा विचार व्यक्त केला.
यावेळी डाॅ. राधाकृष्णन हेरवाडकर यांनी विचार मांडले.
यावेळी सदस्य डाॅ. सुनिल शेट्टी, डाॅ. विनायक पाटील, डाॅ. सागर चिट्टी, डाॅ. शंकर पाटील, डाॅ. वैभव पाटील, डाॅ. एन. एल. कदम, डाॅ. वैभव भालकेकर, डाॅ. मदन कुंभार, आदी डाॅक्टर उपस्थित होते.
यावेळी डाॅक्टर असोसिएशनच्या वतीने नुतन अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगौडा यांचा शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta