खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा, असोगा, भोसगाळी आदी गावांना बससेवा उपलब्ध नाही. यासाठी खानापूर तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल यांच्या प्रयत्नाने नुकताच खानापूर बस आगाारचे डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांनी बस ड्रायव्हरसह मणतुर्गा व्हाया असोगा खानापूर रस्त्याची पाहणी सोमवारी दि. १७ रोजी मणतुर्गा गावाला जाऊन केली. मणतुर्गा गावचे कार्यकर्ते व भाजपचे युवा नेते गजानन पाटील यांच्या उपस्थितीत संपूर्ण रस्त्याची पाहणी केली.
यावेळी बोलताना भाजप नेते गजानन पाटील म्हणाले की, मणतुर्गा, असोगा, भोसगाळी आदी गावचे विद्यार्थी हायस्कूल, काॅलेज शिक्षणासाठी पायी चालत खानापूरला जातात. जवळजवळ पाच ते सहा किलोमीटर अंतर पायी चालत जाणे-येणे विद्यार्थी वर्गाला त्रासाचे होत आहे. नागरिकांना खानापूर तालुक्याच्या ठिकाणी पाया चालत जाणे खुप त्रासाचे होते. यासाठी मणतुर्गा व्हाया असोगा खानापूर बससेवा सुरू करा, अशी मागणी केली असुन सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या काॅलेज विद्यार्थी वर्गाला तसेच नागरिकांना याचा फायदा होतो. तसेच सायंकाळी शाळा, हायस्कूल सुटल्यानंतर पाच वाजण्याच्या सुमारास घरी येण्यासाठी विद्यार्थी वर्गाला बससेवेचा लाभ घेता येतो. तेव्हा दिवसातून दोन वेळा बससेवा सुरू करावी, अशी मागणी केली.
यावेळी खानापूर बस आगाराचे डेपो मॅनेजर महेश तिरक्कन्नावर यांनी लवकरात लवकर मणतुर्गा गावाला बससेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
मणतुर्गा व्हाया असोगा खानापूर बससेवा उपलब्ध होणार असल्याने मणतुर्गा, असोगा, भोसगाळी आदी गावच्या विद्यार्थी वर्गातुन नागरिकांतून समाधानाचे वातावरण पसरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta