Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूरच्या वाजपेयी नगरातील समस्या सोडवा; तहसीलदाराना निवेदन

Spread the love

खानापूर : खानापूर शहराच्या उपनगरातील वाजपेयी नगरातील रस्ते, गटारी, पाणी, पथदिवे आदी समस्या सोडवा, अशा मागणीचे निवेदन वाजपेयी नगरातील रहिवाशांनी भाजप नेत्यांच्या नेतृत्वखाली तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना देऊन समस्या सोडवा अशी मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, वाजपेयी नगरातील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी चांगला रस्ता नाही. गटारीची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरते. या चिखलातून लहान मुलांना, महिलाना ये-जा करणे कठीण होत आहे.
या भागात गटारीची व्यवस्था नाही. त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरते. तसेच पथदिवे नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार माजतो. तेव्हा नगरपंचायतीने या समस्यांनाकडे लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली.
यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाचा स्विकार समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपचे युवा नेते पंडित ओगले, भाजपचे प्रसार प्रमुख राजेंद्र रायका, अनंत पाटील, प्रकाश निलजकर, व वाजपेयी नगरातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *