Tuesday , March 3 2026
Breaking News

आजपासून खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होऊन बरेच दिवस उलटून गेले. मात्र निवडणूक कधी होणार याकडे ग्राम पंचायतीच्या सदस्यांचे लक्ष लागून आहे. अखेर आज गुरूवार दि. २० पासुन खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीला मुहूर्त मिळाला.
खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडणूक येत्या २० जुलै ते २४ पर्यंत पूर्ण होणार आहेत.
यानुसार तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीना ७ दिवस अगोदर दि. १३ ते १६ तारखे दरम्यान नोटिफिकेशन्स लागू करण्यात आले आहे.
खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचा पहिल्या टप्प्यातील ३० महिन्याचा कालावधी दि ३० जुलै ते दि ४ ऑगस्ट या वेळेत पूर्ण होणार आहे.
सध्या तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. काही सदस्यांनी बहुमत मिळविण्यासाठी लाॅबीग सुरू केली आहे.
तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूकीसाठी नोडल अधिकारी म्हणून तालुकास्तरीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
तेव्हा सबंधित अधिकाऱ्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचे वेळापत्रक नोटीसव्दारे ग्राम पंचायतीना कळविले आहे.
गुरूवारी दि. २० जुलै : हेब्बाळ, करंबळ, नंदगड, नेरसे , क. नंदगड, बेकवाड, चापगाव, लोकोळी, गोधोळी, हलगा, शिरोली, नागरगाळी, जांबोटी, बैलूर, निटटूर, कणकुंबी, बिडी, नजिलकोडल, गंदीगवाड, पारिश्वाड,
दि. २१ जुलै: मणतुर्गा, भुरूनकी, रामगुरवाडी, आमटे, शिंदोळी, कोडचवाड, बरगांव, तोपिनकट्टी, हलगा, बिजगर्णी, लोंढा, घोटगाळी, गोल्याळी, निलावडे, पारवाड, नागुर्डा, मंग्यानकोप, केरवाड, इटगी, हिरेमनवळ्ळी,
दि. २४ जुलै : लिगनमंठ, देवलती, क.बागेवाडी, इदलहोंड, गुंजी, कापोली, के. जी., मोहिशेत, गर्लगुंजी, हलकर्णी, कक्केरी, हिरेहट्टीहोळी, इत्यादी.
काही ग्राम पंचायतीच्या निवडणूका सकाळी ११ ते दुपारी २ तर काही पंचायतीच्या निवडणूका ३ ते ५ या वेळेत होणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *