Wednesday , March 4 2026
Breaking News

दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. क्रे. सोसायटी चेअरमनपदी विलासराव बेळगावकर, व्हा. चेअरमनपदी पुंडलिक नाकाडी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील तालुक्यात सर्वात प्रथम सुरू करण्यात आलेल्या दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकताच बिनविरोधात पार पडली.
यावेळी संचालक पदी शंकर कुडतुरकर (जांबोटी), यशवंत पाटील (ओलमणी), विद्यानंद बनोशी (खानापूर), पुंडलिक गुरव (गोल्याळी), पांडुरंग नाईक (आमटे), पुंडलिक नाकाडी (बैलूर), विलास कृष्णाजी बेळगावकर (कुसमळी), खाचाप्पा काजुनेकर, (ओलमणी), हणमंत काजुनेकर( जांबोटी), भैरू लागू पाटील (पिरणवाडी), शाहु गुरव (बैलूर), भाऊ कुर्लेकर (जांबोटी), भरमाणी नाईक (जांबोटी) तर संचालिका पदी सौ. गीता इंगळे (ओलमणी), सौ. सरस्वती पाटील (जांबोटी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सोसायटीच्या चेअरमन पदी विलास (यल्लापा) कृष्णाजी बेळगावकर तर व्हाईस चेअरमन पदी पुंडलिक नाकाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवड होताच सोसायटीच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी विविध गावचे संचालक मंडळ, हितचिंतक व नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *