Sunday , July 26 2026
Breaking News

माळ मारुती पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांना दिली डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक लस 

Spread the love

 

बेळगाव : रात्रंदिवस जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य सुरक्षित रहावे त्यांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे आजार उद्भवू नये याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक देण्यात आली.

येथील माळ मारुती पोलीस संघातील सर्व पोलीस कर्मचारी रात्रंदिवस जनतेप्रति आपली सेवा बजावीत असतात तसेच पावसाळ्यात अहोरात्र काम करत असतात. त्यांना कुठेही आणि कधीही कोणत्याही वेळे थांबावे लागते त्यामुळे डासांपासून उद्भवणारे आजार त्यांना होऊ नये. तसेच त्याना कोणताही आरोग्य विषयक समस्येला तोंड द्यावे लागू नये याकरिता एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके यांच्या  मार्गदर्शाखाली शशिकला जोशी, किरण, विजय यांनी पोलीस स्थानकातील सर्व पोलिसांना डेंग्यू चिकनगुनिया प्रतिबंधात्मक लस दिली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *