Wednesday , March 4 2026
Breaking News

गर्लगुंजी ग्रा. पं. अध्यक्षपदी सौ. ललिता कोलकार, उपाध्यक्षपदी सौ. रेखा कुंभार यांची निवड

Spread the love

 

खानापूर : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील ३० महिन्याच्या कालावधीसाठी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड सोमवारी दि. २४ रोजी ग्राम पंचायतीच्या सभागृहात पार पडली.
यावेळी गर्लगुंजी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण एस सी महिला गटासाठी आले होते. तर उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सामान्य महिला गटासाठी आले होते.
अध्यक्ष सौ. ललिता कोलकार यांचा एकच अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली.
तर उपाध्यक्ष पदासाठी सामान्य महिलातून सौ. रेखा विनोद कुंभार यांची ही बिनविरोध निवड करण्यात आली.
दोन्ही पदाची निवड सर्वाच्या मतानुसार करण्यात आल्याने शांततेत निवडणूक पार पडली.
यावेळी गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे पीडीओ जी. एम. कामकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून कळसा भांडुरा प्रकल्पाचे सहाय्यक कार्यनिर्वाहक अधिकारी यांनी काम पाहिले.
यावेळी ग्राम पंचायतीचे सदस्य परशराम चौगुले, हणमंत मेलगे, प्रसाद पाटील, अजित पाटील, तर सदस्या सौ. अनुराधा निट्टूरकर, सौ. वंदना अशोक पाटील, सौ. सविता सुतार, सौ. अन्नपूर्णा बुरूड तसेच कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
प्रारंभी गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे पीडीओ जी. एम. कामकर यांनी निवडणूकीबद्दल सर्वाना माहिती दिली. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी बिनविरोध करण्यासाठी सर्वानी सहकार्य केले.
नुतन अध्यक्षा सौ. ललिता कोलकार, व उपाध्यक्षा सौ. रेखा कुंभार यांचा ग्राम पंचायतीच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *