खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पशु खात्याच्यावतीने सन 2020-21 सालामध्ये मुख्यमंत्री अमृत योजना निकाल लांबणीवर पडल्याची चर्चा तालुक्यातून होत आहे.
पशुखात्याकडून मुख्यमंत्री अमृत योजनेसाठी आलेल्या अर्जाची छाननी करून तालुका लोकप्रतिनिधींच्याकडे निवड करण्यासाठी पाठविण्यात आले असून अजूनही मुख्यमंत्री अमृत योजनेचा निकाल अद्याप झालेला नाही. मात्र शेतकरीवर्गातून निवडीकडे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्री अमृत योजनेतून गायी, म्हशी देण्यात येणार यासाठी तालुक्यातून 362 अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये सामान्य पुरूष गटासाठी 8, महिला गटासाठी 3, एससी गटासाठी 1 व ओबीसी गटासाठी 3 गायी किंवा म्हशी देण्यात येणार आहेत.
तर तालुक्यातून सामान्य पुरूष गटातून 292 अर्ज, महिला गटातून 27 अर्ज, एससी गटातुन 40 अर्ज, तसेच ओबीसी गटातून 3 अर्ज असे 362 अर्ज आले आहेत.
बजेट नसल्याने चालढकल
पशुखात्याकडे अनुदानासाठी बजेट नसल्याने अद्याप योजनेचा निकाल लागला नाही. बजेट येताच निवड करून यादी जाहिर करण्यात येणार.
सध्या अचारसंहिता लागू असल्याने पुन्हा येत्या 16 डिसेंबर पर्यत तरी मुख्यमंत्री अमृत योजनेचा निकाल मिळणे मुष्कील आहे. त्यानंतर या योजनाचा निकाल लागणार आहे.
———-
मुख्यमंत्री अमृत योजनेसाठी सरकारकडे बजेट नसल्याने योजनेसाठी अनुदान आले नाही. अनुदान येताच कमिटीच्यावतीने मुख्यमंत्री अमृत योजनेचा निकाल जाहिर करण्यात येईल.
डॉ. ए. एस. कोडगी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, खानापूर
Check Also
म. मं. ताराराणी पदवीपूर्व कॉलेजची कुमारी साधना होसुरकर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात…
Spread the love खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर या विद्यालयातील …