कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथील भारतीय सेवा आश्रम संस्थापक अमर पोवार यांना निपाणी येथे सापडलेल्या अनाथ लहान मुलीचा सांभाळ आता बाल कल्याण समितीकडे होणार असल्याची माहिती बालकल्याण समिती सदस्या उमा भांडणकर यांनी सांगितले.
मंगळवार तारीख 23 रोजी मत्तीवडे तालुका निपाणी येथील भारतीय सेवा आश्रम येथे लहान अनाथ वैष्णवीला बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करताना त्या बोलत होत्या.
सदर अनाथ मुलेचे ममदापूर येथे मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या उपस्थितीत वैष्णवी असे नामकरण करण्यात आले आहे.
उमा भांडणकर बोलताना पुढे म्हणाल्या, लहान अनाथ वैष्णवीचा सांभाळ शासकीय बालकल्याण समितीकडे होणार असून वैष्णवीची पूर्ण जबाबदारी बाल कल्याण समितीकडे राहणार आहे.
यावेळी बोलताना भारतीय सेवा आश्रमचे संस्थापक अमर पोवार यांनी निपाणीमध्ये सदर लहान अनाथ मुलगी सापडली होती. गेल्या वीस दिवसांपासून या लहान अनाथ मुलीचा आश्रमात सांभाळ करण्यात येत होता. शासकीय बाल कल्याण समितीकडे अनाथ बालिकेला देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी निपाणी सीडीपीओ सुमित्रा डी. बी., बाल कल्याण समिती अधिकारी सचिन हिरेमठ, अंगणवाडी निरीक्षक व्ही. बी. मस्तावळे, भारतीय सेवा आश्रमच्या शुभांगी पोवार, पत्रकार अनिल पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी कुळवमोडे यांच्यासह पदाधिकारी, अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होत्या.
Check Also
पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …