बेळगाव : १६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूर यांच्यावतीने डेपो मॅनेजर श्री. आनंद शिरगुप्पीकर यांना निवेदन देण्यात आले होते की, खानापूर ते नागरगाळी हि बस संध्याकाळी ५.३० या नेहमीच्या वेळेवर सोडण्यात यावी, म्हणजे विद्यार्थ्यांचे वर्ग चुकणार नाहीत व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री. धनंजय पाटील, सचिव सदानंद पाटील, राजू पाटील, मारुती गुरव, रणजीत पाटील, बाळकृष्ण पाटील, किशोर हेबाळकर, ज्ञानेश्वर सनदी, भूपाल पाटील, तालुका समितीचे गोपाळ पाटील, गोपाळ देसाई, रमेश धबाले, नारायण कापोलकर, मरू पाटील, शिवसेनेचे के.पी. पाटील विद्यार्थी वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते. मुलांची समस्या सोडविण्यासाठी खानापूर युवा समितीने सतत पाठपुरावा केला, त्या पाठपुराव्याला आज यश आले व त्या निवेदनाची दखल घेऊन डेपो मॅनेजर श्री. आनंद शिरगुप्पीकर यांनी २४ नोव्हेंबर २०२१ रोजी मुलांच्या समवेत ती बस सोडण्यात आली, याचे औचित्य साधून डेपो मॅनेजर यांचा सत्कार महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आला व आभार मानण्यात आले. यावेळी कार्यकर्ते बाळकृष्ण पाटील व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
