खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील एससी/एसटी समाजाची बैठक खानापूर रेल्वे स्टेशन रोड वरील समुदाय भवनात शुक्रवारी पार पडली.
या बैठकीत मल्लेशी पोळ यांनी खानापूर शहरातील जांबोटी क्राॅस वरील जवळपास ६६ गाळेधारकांच्या गाळ्याना जेसीबीचा धाक दाखवून तहसीलदारांनी गाळे उडवून लावली. आता ६६ गाळेधारकांची कुटुंबे उपाशीपोटी राहिलेत. याकडे कुणीच लक्ष दिले नाही. यात एससी/एसटी समाजाची ही कुटुंबे आहेत. त्यांना न्याय कोण देणार? असा सवाल करत तहसीलदारानी आपल्या मालकीची जागा दाखवत १६ गुंठे जमिनीला तारेचे कुंपण घालून हक्क दाखविला. तर दुसरीकडे ६६ गाळेधारकांच्या पोटावर पाय मारला. त्याना न्याय द्या, अशी मागणी एस सी एस टी समाजाचे नेते मल्लेशी पोळ यांनी बैठकीत केली.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी गाळे संबंधी तहसीलदार, नगरपंचायतीचे चीफऑफिसर व गाळेधारकांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. त्यानंतर गाळेधारकांच्या विषयावर पडदा पडला.
यावेळी शहरातील रस्त्याची चाळण झाली आहे. यावर चीफ ऑफिसर काय करतात. असा सवाल मल्लेशी पोळ यांनी उपस्थित केला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रकाश गायकवाड होते. व्यासपीठावर आमदार विठ्ठलराव हलगेकर, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी इरनगौडर, नगरसेवक लक्ष्मण मादार, डीवायएसपी रवी नाईक, पीएसआय, मजुनाथ नाईक, श्री. लमाणी आदी उपस्थित होते.
यावेळी गिरीष कुरहट्टी यांनी प्रास्ताविक केले.
उपस्थिताच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
शरद चलनाद्वारे यांनी तालुक्यातील शाळा बाह्य विद्यार्थी किती आहेत असा प्रश्न बीईओना केला. संध्या सुरक्षा योजना, तसेच बीपीएल कार्ड धारकांच्या समस्या मांडल्या. श्रीमती वाय. बी. पावसकर यांनी गंदीगवाड गावात शुध्द पाणी पुरवठा योजनेबाबत नाराजी व्यक्त करत अधिकारी वर्गाने लक्ष देण्याची मागणी केली. चिक्कमनोळी- गंदीगवाड रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे आहे याबाबत जाब विचारला. हेस्काॅम खात्याने विद्युत खांब, विद्युत तारा याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली.
रघुवीर चलनाद्वारे यानी नि्टटूर ग्रामपंचायत हद्दीत जनता घरावर जमिन मालकाने हक्क चालविला असल्याची तक्रार केली.
तर राजू कांबळे यांनी खानापूर शहरात बेवारस मृतदेहसाठी स्मशानभूमीची मागणी केली. तसेच खानापूर शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेर बसविण्याची सुचना केली.
परशराम कोलकार यांनी सुरापूर येथील शाळेची इमारत मोडकळीस आलेली असुन ती डीमाॅलीश करण्याकडे शिक्षण खात्याचे दुर्लक्ष असल्याचे सांगितले.
मनोहर मादार (दोड्डहोसुर) यांनी गरीबांची घरे बांधण्यास पीडीए, तलाठी, अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. अशी तक्रार केली.
यावेळी अनेक एससी एसटी नेत्यांनी समस्यांचा वर्षाव केला.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी सर्व समस्या चर्चा करून सोडवू असे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta