खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात अंगणवाडी शिक्षिका भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. खानापूर तालुका हा मराठी भाषिक तालुका असुन तालुक्यात ८० टक्के नागरिक मराठी भाषिक आहेत. तर केवळ २० टक्के नागरिक कन्नड भाषिक आहेत. अशा तालुक्यात जर अंगणवाडी शिक्षिका भरतीच्या वेळी सरकारने अर्जदाराना प्रथम भाषा १२५ मार्काचा कन्नड विषय पास पाहिजे अशी अट घातली तर मराठी माध्यमातून पास झालेल्या एका अर्जदाराला अंगणवाडी शिक्षिकेसाठी अर्ज करता येणार नाही.
त्यामुळे मराठी भाषिक अंगणवाडी वर मराठी माध्यमाच्या शिक्षिकाना काम मिळणार नाही. तर दुसरीकडे प्रथम भाषा कन्नडमध्ये पास झालेल्या कन्नड भाषिक अर्जदाराना मराठी माध्यमाच्या अंगणवाडीवर काम करणे कठीण होणार आहे.
मराठी भाषिक अंगणवाडीवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रथम भाषा कन्नड विषयाची सक्ती करू नये. त्याना व्दितीय भाषा कन्नड विषयाची सक्ती करावी. जेणेकरून मराठी माध्यमाच्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून अर्ज करण्यास संधी मिळेल, तालुक्यातील अनेक मराठी अंगणवाडी वर शिक्षिकांच्या तसेच हेल्परांच्या जागा खाली आहेत. यामध्ये अंगणवाडी शिक्षिकासाठी ४८ जागा असुन हेल्पर (मदतनीस) साठी ८४ जागा आहेत.
तरी खानापूर तालुक्यातील अंगणवाडी साठी अर्ज करू इच्छिणार्याना प्रथम भाषा मराठी असावा. तर तृतीय भाषा कन्नड विषयाची सक्ती करावी, अशी मागणी खानापूर तालुक्यातील अंगणवाडी अर्जदारातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta