Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर पीकेपीएस संघाच्या चेअरमनपदी नारायण कार्वेकर तर व्हाईस चेअरमन पदी परशराम ठोंबरे

Spread the love

 

खानापूर : खानापूर शहरातील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या चेअरमनपदी पुन्हा माजी चेअरमन व माजी जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर (मोदेकोप) यांची तर व्हाईस चेअरमनपदी परशराम ठोंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित चेअरमन गेल्या पंधरा वर्षे पासुन चेअरमनपदाची धुरा सांभाळली आहे.
त्यामुळे त्यांना पुन्हा चेअरमनपदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी संचालक शंकर पाटील (कुप्पटगिरी) यांनी खानापूर पीकेपीएस संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोधात व्हावी. यासाठी संचालकसह नेते मंडळीनी सहकार्य केले. त्याबद्दल सर्वाचे आभार मानले.
तर मॅनेजर दत्ता बेळगांवकर यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे शाल, पुष्पहार भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक अशोक पाटील, नारायण पाटील, संजय देवलतकर, सुनील बिर्जे, सुरेश सुळकर, राजाराम मादार, संभाजी पाटील, मेघश्याम गाडी, माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई, सह अनेक सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सतीश घाडी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *