खानापूर : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या नंदगड मार्केटिंग सोसायटीविरोधात माजी आमदार डॉ. निंबाळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन सोसायटीचा खत विक्रीचा परवाना रद्द केल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणी खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. नंदगड सोसायटीमध्ये खतांच्या किमतीत फेरफार करून शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे उकळले जात होते. मार्केटिंग सोसायटीच्या या अनागोंदी कारभाराबद्दल डॉ.अंजली निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दिली होती. त्याची तात्काळ दाखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नंदगड मार्केटिंग सोसायटीचा खत विक्री परवाना रद्द करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नंदगड मार्केटिंग सोसायटीचा भ्रष्ट कारभार पाहता या सोसायटीचा राशन वितरणामध्ये सुद्धा सावळा गोंधळ झाला नसेल कशावरून असा प्रश्न खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केला आहे.