खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरसह तालुक्यातील जनतेचे आधार स्थान म्हणून खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याकडे पाहिले जाते. मात्र गेली कित्येक वर्षांपासून खानापूर सरकारी दवाखान्याच्या आवारातील रस्त्याची दुर्दशा कधी संपलेली नाही. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी कधी निधीच सापडत नाही काय? असा सवाल येथे येणाऱ्या रूग्णासह तालुक्यातील जनतेतून विचारला जात आहे.
खानापूर शहराच्या सरकारी दवाखान्याच्या आवारातील रस्त्यावर जागोजागी अनेक खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून गरोदर महिलाना दुचाकीवरून ये-जा करताना असह्य त्रास होतो. तर वयोवृद्ध रुग्णाना आणताना जाताना खड्ड्याशी सामना करावा लागतो.
सरकारच्या निधीतून तरी खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारातील रस्त्याचे पॅचवर्क करून गरोदर महिलांना, वयोवृद्ध रूग्णाना येणा- जाण्याची सोय करावी.
आतापर्यंत सरकारी दवाखान्याच्या कामासाठी लाखो रूपयांचा निधी आला असेल मात्र रस्त्याचे काम कधी झाले नाही. तेव्हा खानापूरच्या आमदारांनी तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या सोयीसाठी तरी सरकारी दवाखान्याच्या आवारातील रस्त्याचे पॅचवर्क करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी खानापूर शहरासह तालुक्यातील जनतेतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta