
शिक्षकांतून समाधान
खानापूर : नेहमीच चर्चेत असलेल्या खानापूर येथील दि. खानापुर तालुका प्रायमरी टीचर्स को-ऑप. सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सभासदांच्या मागणीनुसार ठराव करण्यात आला होता. परंतु ही प्रक्रिया मर्यादित वेळेच्या नंतर झाल्यामुळे ३० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १५ उमेदवारांची निवड ही एका ज्येष्ठ सभासदाच्या मतदानाने पार पडण्यात आली. सर्व उमेदवारांच्या आवाहनानुसार सोसायटीच्या इतर सभासदांनी मतदान न करण्याचा निर्णय घेऊन सहकार्य केले.
यावेळी संचालक पदी निवड झालेले उमेदवार सामान्य गट
वाय्. एम्. पाटील, बी. बी. चापगावकर, श्री. के. एच्. कौंदलकर, सतीश एल्. हळदणकर, महेश व्ही. कुंभार, नेताजी एल्. शिवनगेकर, जे. पी. पाटील, डी. एस्. सोनारवाडकर, लक्ष्मण व्ही. गुरव, ओबीसी, अ वर्ग श्री. आय. जे. बेपारी, ओबीसी ब वर्ग शिवानंद एम्. पाटील, महिला सौ. जयश्री आ. मुरगोड, श्रीमती मीरा एस पाटील, परिशिष्ट जाती प्रकाश एस्. मादार, परिशिष्ट वर्ग
बी. बी. मेदार आदींची निवड होऊन नवनिर्वाचित संचालकांचा पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. यावेळी सेक्रेटरी, कर्मचारी वर्ग व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta