खानापूर : गुंजी गावामध्ये छावणीतील पाळीव डुक्कर सोडलेली असल्यामुळे गावात डुकरांचा उपद्वाप वाढलेला आहे. याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. परिसरातील शेत पिकांचे देखील नुकसान होत आहे. त्यासाठी डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, असे निवेदन गुंजी ग्रामस्थांनी पीडीओ आणि ग्रामपंचायत अध्यक्षांना दिले आहे.
पाळीव डुकरे गावामध्ये व परिसरातील शेतांमध्ये घुसून शेतीचे नुकसान करत आहेत. एकीकडे जंगलातून शेतात। येणाऱ्या जंगली प्राण्यांपासून शेतीचे रक्षण करणे कठीण बनले आहे व त्यातच भरीत भर म्हणून या डुकरांचा उपद्रव सुरू आहे. त्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
दोन वर्षांपूर्वी डुकरांची संख्या 25 ते 30 की होती मात्र आता ती 150 ते 200 पर्यंत पोहोचलेली आहे. डुकरांच्या मोकाट वावरामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या मोकाट डुकरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.