खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ विस्ताराने मोठे त्यातच जंगलाने व्यापलेला तालुका असल्याने नुकताच खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळातील शिक्षकांच्या तालुका बाहेर व अतंर्गत तालुक्यात झालेल्या बदल्यामुळे तालुक्यातील जवळपास ३० शाळातून कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने पालकांनी विद्यार्थ्याचे भवितव्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना दुसरीकडे हलविण्याने विद्यार्थ्याची संख्या कमी झाली. परिणामी विद्यार्थ्याची संख्या कमी होताच माध्यान्ह आहार योजनेंतर्गत आयोजित स्वयंपाकीन महिलाना कमी करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.
त्यामुळे खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षकांच्या बदलीचा परिणाम अनेक प्रकारे दिसून येत आहे.
सध्या प्राथमिक शाळांतील शिक्षक बदली निमित्ताने तालुका बाहेर जाण्यास धडपडत आहेत. तर दुसरीकडे नविन शिक्षक नियुक्तीसाठी सरकार उदासिन आहे. असे असताना खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळातील विद्यार्थ्याचा शैक्षणिक दर्जा ऐरणीवर आला आहे.
तालुक्यातील काही शाळामधून दोन तीन शिक्षक बदली निमित्ताने बाहेर पडणार. अशा शाळामध्ये शिक्षक नसल्याने पालकांतून नाराजी पसरली आहे. त्यामुळे पाल्याचे भविष्य ओळखुन मुलाना शाळेतून बाहेर पाठविण्याचा विचार करताना दिसत आहे. असे असताना खानापूर तालुक्यातील मराठी प्राथमिक शाळा टिकविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. संबंधीत खात्याचे बीईओ काय करणार याकडे पालक वर्गाचे लक्ष लागुन आहे.
Belgaum Varta Belgaum Varta