Monday , September 21 2026
Breaking News

मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केली शहरातील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी!

Spread the love

 


बेळगाव : महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज सकाळी शहरातील विविध भागात भेट देऊन कचऱ्याच्या विल्हेवाटीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
सकाळी 5.30 वाजता त्यांनी सदाशिव नगर येथील वाहन शाखेत जाऊन वाहनांची तपासणी केली व वाहनचालकांची उपस्थिती तपासली. सर्व वाहन चालक व क्लिनर यांना सकाळी 5.45 वाजता ड्युटीवर हजर राहून नीट काम करण्याचे निर्देश दिले, त्यांनी स्वत: मनपाच्या कचरावाहू वाहनात बसून कार्यालयाला भेट देऊन नागरी कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासली व आरोग्य निरीक्षकांना सूचना केल्या. त्यानंतर नगरसेवक अफरोज मुल्ला यांच्यासोबत प्रभाग क्र. 5 खडेबाजार व दरबार गल्ली येथील कचराकुंडीची तपासणी करून संबंधित निरीक्षकांना योग्य ते निर्देश दिले. जनतेच्या तक्रारींवर चर्चा करून संबंधितांना निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी कोतवाल गल्ली व काकर गल्ली भाजी मार्केटला भेट देऊन भाजी मार्केट कचऱ्याचीही त्याच दिवशी रात्री ९ नंतर विल्हेवाट लावण्याचे निर्देश संबंधितांना दिले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या पै हॉटेलला भेट दिली आणि कच्च्या कचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. तसेच सर्व मोठ्या कचरा निर्माण करणाऱ्यांना निर्देश देण्यासाठी पर्यावरण अभियंत्यांना बैठक बोलावण्याचे निर्देश दिले. तेथून त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावण्यासाठी अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.
रुक्मिणी नगर येथे नगरसेवकांसह प्रभागात भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधित आरोग्य निरीक्षकांना स्वच्छता राखण्याचे निर्देश दिले. तसेच रुक्मिणी नगर येथील उद्यानाला भेट देऊन रोपे देण्याचे निर्देश उद्यान निरीक्षकांना दिले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *