खानापूर : खानापूर तालुक्यातील गोल्याळी वन विभागाअंतर्गत आवरोळी गावाच्या हद्दीत वन्यप्राण्याची शिकार करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सोमनिंग रवळप्पा कुडोळी (वय 50) व प्रभू सध्दाप्पा कुडोळी (वय 38) यांना अटक करून या दोघांची रवानगी कारागृहात करण्यात आली.
बेळगाव विभाग उपवन संरक्षण अधिकारी कल्लोळकर तसेच नागरगाळी उपविभाग सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी श्री. मल्लिनाथ कुशनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वलय वन अधिकारी गोल्याळी वनश्री हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गवीरेड्याची शिकार करणाऱ्या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करून गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी उपविभागीय वनाधिकारी अशोक हुली, डॉक्टर संजय मगदूम, स्वामी हिरेमठ, वीरप्पा करलिंगणावर, वनपरिक्षेत्रपाल अजय भास्कर, गिरीश मेक्केद, बी.ए. माडीक, गोल्याळी सेक्टर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta