खानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना घटक खानापूर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि पदाधिकारी यांच्याकडून कळविण्यात येते की, सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी ठीक 11 वाजता संघाची मासिक बैठक बोलाविली आहे तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे.
सभेचे विषय
1. मासिक कार्याचा आढावा
2. त्रैमासिक कार्याची नियोजन
3. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय घेणेत तेथील
या सभेला मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे बोलाविण्यात आले आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
मुख्य विषय
* कार्यालयाकरिता योग्य जागेची निवड व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना भेटून निर्णय घेणे.
* सरकारी सेवांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळवून देण्यास संघाकडून प्रयत्न.
* संघाची पतसंस्था व त्याचे नियोजन करून योग्य मार्गदर्शकांच्याकडून अधिकृत परवानगी आणि व्यवस्थापक या विषयावर सखोल चर्चा करून निर्णय घेण्याचा आहे.
* आपल्या सर्वांच्या मतांचा या ठिकाणी आदर होत आहे लेखी सूचना देण्याचे असल्यास सभागृहामध्ये सभेपूर्वी आपल्या सूचना ऑफिसला सुपूर्द करण्याचे आहे किंवा सभाध्यक्षांची परवानगी घेऊन संक्षिप्त व प्रभावी सूचना देणे हरकत नाही.
* खानापूर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ व्हावा म्हणून प्रत्येक सभासदांनी आपल्याबरोबर एक सभासद संस्थेला जोडावा व त्यांना सेवा द्यावी अशी विनंती संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta