खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेच्या पटांगणावर खानापूर झोनल माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धाचा प्रारंभ गुरूवारी करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ इंग्रजी शाळेचे सचिव डाॅ. डी. ई. नाडगौडा होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बीईओ राजश्री कुडची, डॉ पी. एन. पाटील, शंकर कम्मार, डॉ एन. एल. कदम, मुख्याध्यापक सलिम कित्तूर, अनिल कदम, डॉ. एफ. एम. पाटील, डॉ. चिट्टी, सी. आर. पी. बसवराज बेनकट्टी, प्राचार्या सौ. दिव्या नाडगौडा, व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्या सौ. दिव्या नाडगौडा यांनी केले.
तर स्वागत सचिव डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाची सुरूवात मुलीच्या स्वागत गीताने झाली.
तर बीईओ राजश्री कुडची व उपस्थित मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलन फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी स्पर्धाचा शुभारंभ बीईओ राजश्री कुडची यांनी क्रीडा ज्योत पेटवून केली. खेळांडुना क्रीडा शिक्षकानी शपथविधी देऊ केली.
यावेळी बोलताना सचिव डॉ. डी. ई. नाडगौडा म्हणाले की, समर्थ इंग्रजी शाळेकडे पहिल्यांदाच माध्यमिक शाळा झोनल क्रीडा स्पर्धाचे यजमानपद दिले. या स्पर्धा पार पाडण्यासाठी शिक्षकवर्गाने परीश्रम घेऊन या स्पर्धेचे आयोजन केले. तेव्हा खेळांडुनी जिद्दीने खेळ खेळुन आपले कौशल्य दाखवावे, असे आवाहन केले.
यावेळी बीईओ राजश्री कुडची यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
तर सलिम कित्तूर, बसवराज बेनकट्टी आदींनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया चौगुले यांनी केले. तर आभार सहना मुल्ला यांनी मानले. या स्पर्धेत १५ हायस्कूलच्या खेळाडूंनी भाग घेतला होता.