खानापूर : मीलॉग्रेस चर्च शाळा खानापूर येथे झालेल्या खानापूर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
मुलांच्या प्राथमिक विभागातून सचिन डिगेकर, कृष्णा मेंडीलकर, शंकर खैरवाडकर तसेच मुलींच्या प्राथमिक विभागातून गीता डिगेकर, प्रेमीला मेंडीलकर, समीक्षा गावकर, वर्षा मेंडीलकर, ममता गावकर या आठ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी श्रीधर करंबळकर, बाळाताई मेंडीलकर, गायत्री वरकडकर, सातुली गावकर, वरुणा पोटे यांची माध्यमिक विभागातून जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शाळेचे आजी-माजी एकंदरीत तेरा विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडल्या गेल्याबद्दल तालुक्यातून अबनाळी शाळेचे विशेष कौतुक होत आहे. या विशेष साधने बद्दल खानापूर तालुक्याच्या बीईओ राजेश्वरी कुडची, बीआरसी अधिकारी ए आर अंबगी, तालुका क्रीडाधिकारी सुरेखा मिरजी, तालुका अक्षरदासोह अधिकारी महेश परिट यानी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक पी एस गुरव, सहशिक्षक रमेश कवळेकर, विजय पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष प्रभाकर डिगेकर, उपाध्यक्षा सपना गावकर यांनी अभिनंदन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta