बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. मध्यवर्ती समितीच्या कार्यकारिणीवर घेण्यासंदर्भात खानापूर समितीच्या 22 सदस्यांची नवीन यादी आज शुक्रवारी खानापूर समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई आणि सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी मालोजी अष्टेकर यांची भेट घेऊन सदर यादी त्यांच्याकडे सुपूर्द केली.
खानापूर समितीने नुकतीच तालुक्याची नवीन कार्यकारिणी निवडली. दि. 16 ऑगस्ट रोजी शिवस्मारक येथे झालेल्या बैठकीत मध्यवर्ती समितीच्या कार्यकारिणीवर नवीन 22 जणांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार नवीन यादी मालोजी अष्टेकर यांना देण्यात आली त्यावर अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्या सह्या आहेत.
मध्यवर्ती समितीत नवीन नावे समविष्ट केलेल्यांची यादी अशी आहे. माजी आमदार दिगंबर पाटील, खानापूर तालुका समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, आबासाहेब दळवी खानापूर, मारुती परमेकर जांबोटी, विलास बेळगावकर कुसमळी, जगन्नाथ बिरजे खानापूर, जयराम देसाई जांबोटी, बाळासाहेब शेलार मंतुर्गे, नारायण कपोलकर सावरगाळी, गोपाळ पाटील गर्लगुंजी, पांडुरंग सावंत गर्लगुंजी, शामराव पाटील चन्नेवाडी, रवींद्र शिंदे जांबोटी, रणजीत पाटील हलगा, राजाराम गावडे कणकुंबी, रुकमाना झुंजवाडकर खैरवाड, रमेश धबाले चापगाव, सदानंद पाटील गर्लगुंजी, रामचंद्र गावकर सातनाळी, अजित पाटील गर्लगुंजी.
Belgaum Varta Belgaum Varta