खानापूर : खानापूर येथील दि. खानापुर तालुका प्रायमरी टीचर्स को-ऑप. सोसायटीच्या चेअरमन, व्हा .चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सभासदांच्या मागणीनुसार चर्चा करण्यात आली होती. १५ संचालकांच्या मतानुसार शनिवारी दि. १२ ऑगस्ट रोजी सोसायटीच्या सभागृहात चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाची निवड बिनविरोध पार पडली.
यावेळी चेअरमनपदी वाय. एम. पाटील यांची निवड करण्यात आली. तर व्हा. चेअरमनपदी डी. एस सोनारवाडकर यांची बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी श्री. नवीन उपस्थित होते. यावेळी संचालक बी. बी. चापगावकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन वाय. एम. पाटील व व्हा. चेअरमन डी. एस. सोनारवाडकर यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी मावळते चेअरमन बी. एम. पाटील यांचाही पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक तसेच सभासदांनी आपल्या भाषणात सोसायटीच्या प्रगतीबद्दल विचार व्यक्त केले. तसेच काही सुचना माडल्या.
संचालक बी. बी. चापगावकर, के. एच्. कौंदलकर, सतीश एल्. हळदणकर, महेश व्ही. कुंभार, नेताजी एल्. शिवनगेकर, जे. पी. पाटील, डी. एस्. सोनारवाडकर, लक्ष्मण व्ही. गुरव,
आय. जे. बेपारी, शिवानंद एम्. पाटील, सौ. जयश्री आ. मुरगोड, श्रीमती मीरा एस पाटील, प्रकाश एस्. मादार, बी. बी. मेदार तसेच सोसायटीचे सभासद उपस्थित होते. यावेळी सेक्रेटरी, कर्मचारी वर्ग व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार संचालक शिवानंद एम. पाटील यानी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta