खानापूर : तालुक्यात मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे यामध्ये मराठी शाळा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करून पाठबळ देण्याचे काम केले आहे. त्यामुळे युवा समितीचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
बेळगाव युवा समितीच्यावतीने हेब्बाळ, खैरवाड, झुंजवाड, बेकवाड कुणकीकोप आदि गावातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. झुंजवाड येथील सरकारी मराठी शाळेत साहित्य वितरण करतेवेळी आबासाहेब दळवी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मिलिंद देसाई यांनी युवा समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. समितीचे पदाधिकारी रुकमान्ना जुंझवाडकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता जोशी यांनी स्वागत केले. यावेळी निवृत्त शिक्षक के. के. धबाले, आप्पाजी पाटील यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. विविध गावातील पालकांनी युवा समितीच्या कार्याचे कौतुक करीत शैक्षणिक साहित्य वितरण करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याबाबत समाधान व्यक्त करून या कार्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta