खानापूर : खानापूर तालुक्यातील सर्व मुस्लीम बांधवांनी अंजुमन इस्लाम मायनॉरीटीज वेलफेअर फाउंडेशनची स्थापना एक वर्षापूर्वी केली होती आणि अध्यक्ष म्हणून नासीर बागवान यांची निवड झाली होती. पण त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्या जागी अंजुमन कमिटीचे उपाध्यक्ष इरफान रफिकअहमद तालिकोटी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी मन्सुर अहमद ताशीलदार यांची निवड करण्यात आली आहे.
आज ता. 22 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11. वाजता असोगा रोड टेकडी फार्म हाउसमध्ये सर्व अंजुमन सदस्य कमिटीची बैठक झाली व या बैठकीमध्ये इरफान रफिकअहमद तालिकोटी यांची अध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी मन्सुर अहमद ताशीलदार (नंदगड) व सेक्रेटरी म्हणून मुजफर टेकडी (वकील) आणि खजिनदार म्हणून मुगुटसाहब समशेर (बुड्डा) बिडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी कमिटीमार्फत पुष्पहार घालून सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणावेळी इरफान तालिकोटी यांनी उपस्थितांचे आभार मानून समाजाला आवश्यक कार्याशी सर्वांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे कार्य करीन असे म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta