खानापूर : खानापूर तालुका हा मराठी भाषिक भाग म्हणून ओळखला जातो. कर्नाटक राज्यात नोकरीसाठी कन्नड सक्ती केल्याने या भागातील युवकांच्यावर बेकारीची समस्या भेडसावीत आहे.
या मराठी भाषिक सीमाभागातील युवक युवती नोकरीसाठी वनवन हिंडतात. मात्र कर्नाटकात नोकरी मिळत नाही. अशी परिस्थिती असताना खानापूर तालुक्यातील सात युवतींनी देशाच्या सेवेसाठी सीआरपीएफ मेगाभरतीत भरती होऊन देश संरक्षणाचे धाडस केले आहे.
त्यातील दोन सख्ख्या बहिणी मयूरी अंधारे व माधुरी अंधारे या यडोगा (ता. खानापूर) गावच्या माजी ग्राम पंचायत सदस्य मल्लापा अंधारे यांच्या कन्या असुन त्यांची नुकताच सीआरपीएफ मेगाभरतीत भरती झाल्यानिमित्त खानापूर शिवस्मारक चौकातील रामदेव स्वीटमार्टच्यावतीने मालक राजेंद्र रायका यांनी दोन्ही बहिणीचे मंगळवारी पुष्पहार व पेढे भरवून अभिनंदन केले.
भारत देशाच्या सेवेसाठी भरती झालेल्या दोन्ही बहिणीना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे सोशल मिडीया प्रमुख राजेंद्र रायका, केएमएफचे माजी संचालक संतोष पाटील (कारलगा), जेडीेएसचे नेते रेव्हणसिध्दया हिरेमठ, पालक मल्लापा अंधारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta