
खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी -इदलहोंड या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
गेल्या पाच वर्षात या रस्त्याच्या दुरूस्तीकडे लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या गर्लगुंजी-इदलहोंड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
यंदाच्या पावसाळ्यातही या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले.
त्यामुळे डांबरीकरणाचा पत्ताच नाही. गर्लगुंजी-इदलहोंड रस्त्यावरून नेहमी वीटा, वाळूच्या अवजड वाहनाची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावरील डांबरीकरण काही दिवसात नाहीसे झाले. इतक्या निकृष्ट दर्जाचे काम या रस्त्याचे झाले होते.
सध्या या रस्त्यावरून गर्लगुंजी, निडगल, तोपिनकट्टी, सिंगीनकोप, इदलहोंड गावच्या वाहनाची वर्दळ असते. त्यातच वीटा, वाळूची वाहने ये-जा करतात. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. येत्या उन्हाळ्यात या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी या भागातील जनतेतून तसचे वाहनधारकातून होत आहे.
तेव्हा आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी प्रयत्न करून रस्ता रहदारी योग्य करावा अशी मागणी केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta