खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ते, गटारी, कामाकडे खानापूर नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे.
याबाबतीत संबंधित नगरसेवक, चीफ ऑफिसर उदासीन आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात गटारी नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते.
पावसाळ्यात रस्त्यावर पसरलेल्या चिखलामुळे निसरड झाली होती. या चिखलामुळे शाळेला जाणारी शाळकरी मुले घराबाहेर पडण्यास नाराज होत आहेत.
गटारीची कामेही विद्यानगरात अर्धवट झाली आहेत. त्यामुळे गटारी नसलेल्या भागात पाण्याची डबकी निर्माण झाली आहेत.
एकीकडे विद्यानगरात गटारी, रस्ते करण्यास निधीची कमतरता असते. मात्र दुसरीकडे चीफ ऑफिसरच्या सोयीसाठी फोर व्हीलर वाहनाची सोय करण्याकडे खानापूर नगरपंचायतीला पैसे उपल्ब्ध होतात. रहिवासीयांचे सुख दु:ख नगरपंचायतीला नाही. ऑफिसरच्या वाहनासाठी पैसा उधळला जातो. ही नगरपंचायतीची विकास कामे म्हणायची काय? असा सवाल रहिवाशातुन चर्चिला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta