खानापूर : बेळगाव – चोर्ला मार्गावरील चिखले गावाजवळ आज पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक बसून अपघात झाला आहे. या अपघातामुळे जांबोटी- चोर्ला मार्गावरील गोव्याला जाणारी वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. अपघातग्रस्त ट्रक रस्त्यातच आडवे झाल्याने क्रेनच्या सहाय्याने ते बाजूला करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठ तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta