खानापूर : रामनगर येथील बापूजी ग्रामीण विकास समितीचे पदवीपूर्व महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय क्रिडा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. श्री. राजेश देसाई यानी प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाला चालना दिली. सशक्त भारत अंतर्गत राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक पद्धतीने क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या. एकुण सहा गटामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या.
बापूजी गटाने हॉलीबॉल, स्वामी विवेकानंद गटाने खो-खो मध्ये प्राविण मिळवले. लंगडी मध्ये पी टी उषा गटाने, लिंबू चमचा मध्ये मेरीकोम गटाने, लगोरी मध्ये मिल्का सिंग , फळी आव्हान मध्ये ध्यानचंद व पी टी उषा गटाने, रस्सी खेच मध्ये बापूजी गटाने तर दोरी उड्यामारणे मध्ये स्वामी विवेकानंद गटांनी बाजी मारली. यावेळी श्रीमती मेघना नाईक, श्रीमती भारती कुंभार, श्री. मल्लिकार्जुन कम्मार, श्री. संजय गौडा व श्री. राजे देसाई यांनी सहकार्य केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सशक्त भारत कसा होईल याबद्दल राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे पटवून देण्यात आले. एन्. एस्. एस् कार्यक्रमाधिकारी श्री. प्रेमानंद यस्. परब यानी कार्यक्रमाचे आयोजन केले व मान्यवरांचे स्वागत आणि शेवटी आभार व्यक्त केले.