खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगार व कर्मचारी वर्गाच्या आंदोलनाला खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या निर्णयाने आंदोलनाला पूर्णविराम मिळाले.
याबाबतची माहिती अशी, खानापूर नगरपंचायतींचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांच्या मनमानी कारभाराला स्वच्छता कामगार, नगरपंचायतींचे कर्मचारीवर्ग कंटाळले. त्यामुळेच स्वच्छता कामगार युनियनने शुक्रवारी सकाळपासुन नगरपंचायतीच्या कार्यालयाला टाळे टोकून आंदोलन छेडले. यावेळी आदोलनच्या घटनास्थळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी भेट देऊन माहिती घेतली. नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे मनमानी कारभार करत असुन त्यांची हकालपट्टी हा एकच पर्याय. त्याशिवाय नगरपंचायतीचे कामकाज सुरळीत होणार नाही. अशी भूमिका आदोलनकर्त्यांनी घेतली.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर, तहसीलदार प्रकाश गायकवाड, सीपीआय मजुरांना नाईक तसेच चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगारांचे म्हणने ऐकूण घेऊन चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांच्याकडील कामकाज काढून त्याच्या सहाय्य अधिकाऱ्याकडे देऊन त्याची इतरत्र हकालपट्टी करण्यात येईल. नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचारी वर्गाचे तीन महिन्याचे पगार लवकरात लवकर काढून देण्यात येतील. याला आंदोलकानी टाळ्या वाजवून मान्यता दिली.
व उद्यापासून शहरातील कचरा, पाणीपुरवठा व इतर कामे सुरळीत चालू राहतील, असे आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी सांगितले. व नगरपंचायतींच्या स्वच्छता कामगार व कर्मचारी वर्गाचे आंदोलनाला पूर्णविराम दिला.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजपचे युवा नेते पंडित ओगले, राजद्र रायका, नगरसेवक नारायण मयेकर, तोहीद चांदखन्नावर, प्रकाश बैलुरकर, नारायण ओगले व इतर नगरसेवक तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.