खानापूर : पदवीपूर्व जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत बेळगावच्या जीएसएस कॉलेजच्या मुला-मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. खानापूर तालुक्यातील बिडी येथील होली क्रॉस पदवीपूर्व कॉलेजतर्फे आयोजित पदवीपूर्व अंतर महाविद्यालयाच्या मुला- मुलींच्या बास्केटबॉल व कराटे स्पर्धेत मुला-मुलींच्या सर्व प्रकाराच्या विभागामध्ये स्पर्धा संपन्न झाल्या. त्या स्पर्धेला पदवीपूर्व विभागाचे खानापूर तालुक्याचे प्रभारी क्रीडा शिक्षक श्रीधर हिरेमठ व होली क्रॉस पियू कॉलेजच्या प्राचार्य सिस्टर ज्योती फर्नांडिस व होली क्रॉस संस्थेच्या मॅनेजर सिस्टर फ्लाविया मेंडोंसा व उपप्राचार्य सिस्टर इंनिगो व कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन श्री. हिरेमठ यांनी केले. जिल्ह्यातील एकूण 16 मुलांच्या तर मुलींच्या पाच संघाने बास्केटबॉल स्पर्धेत भाग घेतला होता. अंतिम सामना जीएसएस व आरएलएस संघा दरम्यान झाला.
मुला- मुलींच्या दोन्ही विभागांमध्ये जीएसएस संघाने विजय पटकावला. तसेच कराटे स्पर्धेत सुद्धा विविध विभागात एकूण 84 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महंतेश शिंत्रे, नियाज बागवान डुमिंग नजरेत, सागर फर्नांडिस, मंजुनाथ कदम यांची साथ लाभली.
Belgaum Varta Belgaum Varta