पत्रकार परिषदेत दिली भाजप नेत्यांनी माहिती
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतींचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांच्या विरोधात नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगार व कर्मचारी वर्गाने गुरूवार, शुक्रवारी आंदोलन छेडले.
यावेळी खानापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते, व नागरिकांनी अन्यायग्रस्त स्वच्छता कामगार व कामगारांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर, तहसीलदार प्रकाश गायकवाड, सीपीआय नाईक, भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजप युवा नेते पंडित ओगले, राजेंद्र रायका व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी परिस्थितीची माहिती घेऊन तसेच कामगारांचे म्हणने ऐकूण घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी नगरपंचायतींच्या चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांना सक्तीच्या रजेवर पाठवुन मार्ग काढण्याचे सुचविले. याला चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांनी मान्यताही दिली. असे असताना काही वेळातच नगरपंचायतींचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांनी खानापूर पोलिस स्थानकात भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार दाखल केल्याची माहिती भाजप नेत्यानी शनिवारी भाजप कार्यालयात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल यांनी ही एक अधिकारी होऊन आपल्या जातीचा आधार घेऊन पोलिसांत खोटी तक्रार करणे साफ चुकीचे आहे. त्या अधिकार्यावर कारवाई झालीच पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करतो.
तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी या गोष्टीचा निषेध करत नगरपंचायतींच्या चीफ ऑफिसरच्या वर्तणूकीचा निषेध करत. अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी दाद मागणार आहे, असे सांगितले.
यावेळी भाजपच्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांनी नगरपंचायतींच्या चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांचा निषेध व्यक्त केला.