खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे हे अधिकारी म्हणून नगरपंचायतीवर हजर झाले. तेव्हापासून त्यांनी आपल्या वर्तणुकीचा प्रताप सुरू केला. खानापूर शहराच्या उपनगरातील वाजपेयी नगरात वाजपेयी यांच्या नावाचा फलक स्वत: उपटून काढला. तेव्हापासून ते चर्चेत आले आहे. त्यापाठोपाठ नगरपंचायतींच्या स्वच्छता कामगाराचा तीन महिन्याचा पगार देऊ केला नाही. एवढेच नव्हे तर स्वच्छता कामगाराकडून घरची कामे करून घेणे, स्वत:चे अंग माॅलीश करून घेणे अशा गोष्टी करून घेऊन अधिकारी पदाला काळीमा फासण्याचा प्रकार केल्याने खानापूर नगरपंचायतींच्या स्वच्छता कामगारानी आंदोलन छेडले. शेवटी आमदारांनी मध्यस्थी करून चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे सांगून प्रश्न मार्गी लावला.
मात्र नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांनी याचवेळी भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार करून अधिकाराचा दुरूपयोग केल्याचे दिसून आले. कारण या घटनेच्या वेळी तहसीलदार, सीपीआय अधिकारी तसेच आमदार उपस्थित होते. त्याना खोटे पाडून पोलिसात खोटी तक्रार दाखल करतात, अशी घटना खानापूर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच घडते आहे. यामागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा खानापूर तालुक्यातुन चर्चा होत. तेव्हा यापुढे तालुका अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधीचा प्रत्येक वेळी वचक असणे गरजेचे आहे. नाही तर तालुक्यात सामान्य जनतेला जगणे मुश्कील होणार आहे. तेव्हा लोकप्रतिनिधी तालुका अधिकाऱ्यांच्यावर वचक ठेवून राहणे हिताचे ठरेल.