खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र यावर्षी पावसाने योग्य साथ दिली त्यामुळे तालुक्यातील पिके करपून गेली आहेत. खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करणे गरजेचे आहे. मात्र राज्यातील काँग्रेस सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी कोणतीही सवलती दिली नाही. शेतकऱ्यांच्या कुटूंबासाठी योजना केली नाही. काँग्रेस सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे.
यासाठी भाजप रयत मोर्चाच्यावतीने सोमवारी दि. ११ रोजी दुपारी ३ वाजता खासदार व रयत मोर्चाचे राज्याध्यक्ष इराणा कडाडी यांच्या नेतृत्वाखाली खानापूरातील जांबोटी काॅसवरून मोर्चाचे आयोजन करण्यात आले. तेव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे खानापूर तालुका रयत मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश तिरवीर यांनी बुधवारी दि. ६ रोजी खानापूर येथे बोलविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, लैला साखर कारखान्याचे एमडी सदानंद पाटील, तालुका सेक्रेटरी गुंडू, सुभाष गुळशट्टी, धनश्री सरदेसाई, राजेंद्र रायका, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमोद कोचेरी म्हणाले की, खानापूर तालुका हा दुष्काळ ग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने योजना आखावी. शेतकऱ्यांना सवलती मिळवून द्याव्यात. यासाठी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. तेव्हा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. यावेळी तालुका अध्यक्ष संजय कुबल यांनी काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीच पाऊले उचलली नाहीत. शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तर देश वाचेल तेव्हा सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी पाऊले उचलत नाही तो प्रयत्न भाजपचे प्रयत्न सुरूच राहणार असे विचार व्यक्त केले. धनश्री सरदेसाई यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी भाजपचे प्रकाश निलजकर, मोहन पाटील इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta