शिक्षकाच्या विरोधात बीईओना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : दि. ५ सप्टेंबर शिक्षकदिन साजरा झाल्या झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दि. ६ सप्टेंबर रोजी संगरगाळी (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी शाळेत शाळेचे मुख्याध्यापक मद्यपान करून धिंगाणा घातल्याचे दिसून आले.
लागलीच संगरगाळी शाळेच्या मद्यपान शिक्षकावर कारवाई करावी. या मागणीसाठी खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर यांच्या नेतृत्वाखाली शाळेचे एसडीएमसी कमिटीने बीईओना निवेदन सादर केले.
बीईओ राजश्री कुडची अनुपस्थितीत राहिल्याने मॅनेजर प्रकाश होसमनी यांनी निवेदनाचा स्विकार केला.
निवेदनात म्हटले आहे की, संगरगाळी शाळेचे मुख्याध्यापक हे मद्यपान करून शाळेत धिंगाणा घातल्याचे व्हिडिओ गावकऱ्यांनी केला आहे. अशा शिक्षकावर कारवाई करून निलंबनाचा आदेश बीईओ कार्यालयातून झाला पाहिजे. अन्यथा संबंधित व्हिडिओ जिल्हा अधिकारी, पालकमंत्री, व शिक्षण मंत्र्यापर्यत पाठविण्यात येईल असा इशारा गावकर्यानी दिला.
यावेळी मॅनेजर प्रकाश होसमनी यांनी निवेदनाचा स्विकार करून बीईओ राजश्री कुडची यांच्याकडे निवेदन देतो. त्यावर बीईओ राजश्री कुडची कारवाई करतील असे अश्वासन दिले.
निवेदन देताना खानापूर तालुका ग्रामपंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर, एसडीएमसी अध्यक्ष सुनिल एस, तसेच शंकर गावडा आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta