खानापूर : सालाबादप्रमाणे यंदाही खानापूर येथील तहसील कार्यालयात श्रीकृष्ण जयंती बुधवारी दि. ६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला आमदार विठ्ठलराव हलगेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, माजी जि. प. सदस्य नारायण कार्वेकर, लक्ष्मण बामणे, नारायण कालमनकर, उपतहसीलदार के. आर. कोलकार, श्री. जवळी आदी उपस्थित होते.
प्रारंभी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते श्रीकृष्ण फोटोचे पुजन करण्यात आले. तर उपस्थित मान्य वरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमोद कोचेरी यांनी श्रीफळ वाढविले.
यावेळी यादव समाज व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमोद कोचेरी, संजय कुबल, धनश्री सरदेसाई यांनी श्रीकृष्ण जयंती उत्सवाबद्दल विचार व्यक्त केले.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, श्रीकृष्ण जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशातील अनेक धर्मात ग्रंथ आहेत. श्रीकृष्णची भागवत गीता न्यायालयात शपथ घेऊन सांगीतले जे सांगने ते खरे सांगणे. इतके महत्व श्रीकृष्णाच्या भागवत गीतेला आहे.
तेव्हा श्रीकृष्ण हे सर्वाचे भक्ती स्थान आहे. या श्रीकृष्णाची सर्वानी भक्ती करावी, असे सांगितले.
उपतहसीलदार के. आर. कोलकार यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta