अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
खानापूर : शहर आणि ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळाची विशेष शांतता कमिटीची बैठक शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी अकरा वाजता तालुका पंचायत कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. व्यासपीठावर तहसीलदार श्री. प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक श्री. मंजुनाथ नाईक, तालुका पंचायतीचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी इगनगौडा, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट, हेस्कॉमचे अभियंता श्री लक्ष्मी रंगनाथ, पीएसआय श्री. गिरीश एम, पीएसआय श्री. चन्नबसव बबली, अग्निशमक दलाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीच्या प्रारंभी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी उपस्थित गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांचे स्वागत केले. व गणेशोत्सव काळात घ्यावयाच्या विशेष दक्षतेबद्दल माहिती दिली. सर्व गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी लागणारी रीतसर परवानगी घ्यावी, तसेच 27 सप्टेंबरला मुस्लिम धर्मियांचा ईद मिलाद सण (महंमद पैगंबर जयंती) असल्याने, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, सर्व ठिकाणी शांततेने गणेशोत्सव व ईद मिलाद सन पार पडेल. या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करून, पोलीस प्रशासनालाही सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी देखील मार्गदर्शन केले.
खानापूर शहर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले बोलताना म्हणाले, ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानगीसाठी त्यांनी संबंधित पंचायत विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची विनंती, तालुका पंचायतीच्या कार्यनीर्वाहक अधिकाऱ्यांनी यावेळी केली.
यावेळी गणेशोत्सव मंडळाना रीतसर हेस्कॉम, नगरपंचायत, तसेच पोलीस खात्याची परवानगी मिळण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात, एक खिडकी योजना सुरू करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या बैठकीत खानापूर शहर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले, रवी काडगी, भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल, प्रकाश देशपांडे, नगरसेवक आप्पया कोडोळी, नगरसेवक विनायक कलाल, वसंत देसाई यांनी आपले विचार व्यक्त केले. शेवटी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या आभार प्रदर्शना नंतर बैठकीची सांगता झाली.
यावेळी मुस्लिम समाजाचे नेते बशीर राऊत म्हणाले की, 27 सप्टेंबरला महमंद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने, मुस्लिम निंगापूर गल्लीतून सकाळी दहा वाजता मिरवणुकीला सुरुवात होऊन, बारा वाजता विद्यानगर खानापूर या ठिकाणी मिरवणुकीची सांगता होणार आहे. दोन तासाची ही मिरवणूक असून शांततेत पार पडण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी नगरसेवक रफिक वारीमनी यांनी चर्चेत भाग घेतला होता.
यावेळी प्रकाश चव्हाण, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी, नगरसेवक नारायण ओगले, नगरसेवक रफिक वारीमनी, नगरसेवक तोहीद, अमृत पाटील, राजू देसाई, संजय मयेकर, प्रसाद मांजरेकर, दीपक चौगुले, तसेच खानापूर शहर, व ग्रामीण भागातील सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta