खानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक सभा, सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता, ज्ञानेश्वर मंदिर चिरमूरकर गल्ली खानापूर या ठिकाणी, संघटनेचे अध्यक्ष श्री. वीरभद्र बनोशी सर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
या सभेला खानापूर तालुक्यातील अधिकारी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते, मार्गदर्शक वक्ते या सभेला हजर होणार आहेत. तरी या संघटनेच्या सर्व सभासदांनी वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती संघटनेचे सेक्रेटरी श्री. सी. एस. पवार यांनी केली आहे.
सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
1) त्रैमासिक कार्याचा आढावा व अहवाल.
2) पुढील त्रैमाशीक कार्याचे नियोजन.
3) स्तगन विषयावर चर्चा करून निर्णय.
4) सभासदांच्या वैयक्तिक व सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही व उपायोजना ठरविणे.
5) इतर विषय अध्यक्षांच्या परवानगीने घेण्यात येतील.
6) संस्थेसाठी कार्यालय मंजुरी बाबत चर्चा करून ठराव मंजूर करणे.
Belgaum Varta Belgaum Varta