खानापूर : संगरगाळी सरकारी प्राथमिक शाळेत मद्यपान करून गोंधळ घातलेल्या शिक्षकाला निलंबित केल्याचा आदेश खानापूर शिक्षणाधिकारी (बीइओ) यांनी बजावले.
संगरगाळी सरकारी प्राथमिक शाळेत मद्यपान करून गोंधळ घातलेल्या शिक्षकांबद्दल शाळा सुधारणा कमिटी (एसडीएमसी) व खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर व पदाधिकारी यांनी खानापूर शिक्षण अधिकारी व जिल्हाधिकारी बेळगाव व चीफ सेक्रेटरी जिल्हा परिषद बेळगाव यांच्याकडे तक्रार केली होती व याची दखल जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घेऊन संबंधित शिक्षकाचा मद्यपान करून गोंधळ घातलेला व्हिडिओ सुद्धा मागून घेतला होता. अखेर या प्रकरणाची चौकशी होऊन खानापूरच्या शिक्षणाधिकारी (बीइओ) श्रीमती राजेश्वरी कुडची यांनी, आर. जी. देसुरकर या मुख्याध्यापकाला इतर विविध कारणे दाखवत निलंबित केले आहे.
याबाबत ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे तालुका अध्यक्ष विनायक मुतगेकर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, सदर शिक्षकांबद्दल गेल्या एक वर्षापासून खानापूर बीईओ कार्यालयात सीआरपीने तक्रार रिपोर्ट दिले होते. परंतु शिक्षणाधिकारी कार्यालयातील क्लार्क मॅनेजर व बीईओ यांनी सदर शिक्षकावर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घातले होते. त्यामुळे बीईओ, मॅनेजर व क्लार्क यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणीही केली आहे.