Wednesday , April 22 2026
Breaking News

आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळात 14 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष सुनावणी

Spread the love

 

दोन्ही गटांच्या आमदारांची सुनावणी एकाच दिवशी

मुंबई : आमदार अपात्रतेच्या प्रत्यक्ष सुनावणीची वेळ अखेर ठरलीये. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी होणार आहे. शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर 14 सप्टेंबर रोजी सर्व शिवसेना आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. या सुनावणीला दुपारी बारा वाजता सुरुवात होईल.

राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होणार असून, एकाच दिवशी सर्व 54 आमदारांची सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना हजर राहावं लागणार आहे. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांसमोर तब्बल 34 याचिकांवर सुनावणी होईल. या सुनावणीत वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करून आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी होणार असून, संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावण्यात येईल.

प्रत्येक आमदाराला सुनावणीत आपले युक्तिवाद सादर करण्याची संधी
राज्यातील सत्ताबदलात जुलै 2022 मध्ये झाले. राज्य सरकारवरील विश्वासदर्शक ठराव आणि अध्यक्षांची निवड या 2022 मधल्या आहेत विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेताना राजकीय पक्षाची घटना आणि अन्य बाबीही तपासून पाहिली जाणार आहे. पक्षाचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने होते, हेही अध्यक्षांना तपासावे लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या घटनेनुसार जुलै 2022 मध्ये पक्षप्रमुख कोण होते, पक्षाचे पदाधिकारी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होते आणि इतर तपशील अध्यक्षांनी आयोगाकडून मागविला आहे. ठाकरे-शिंदे गट आणि प्रत्येक आमदाराला सुनावणीत आपले युक्तिवाद सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात भीषण टक्कर; 11 जणांचा जागीच मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलीही दगावल्या!

Spread the love  मुंबई : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सुमारे 11 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *