Thursday , September 19 2024
Breaking News

खानापूरसह बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; रयत संघटनेची मागणी

Spread the love

 

हालगी मोर्चाद्वारे तहसीलदारांना निवेदन

खानापूर : कर्नाटक राज्य रयत संघटना आणि खानापूर तालुका शेतकरी हसीरू सेना यांच्याकडून तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना खानापूर तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करावा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हलगी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. तहसीलदारांच्या अनुपस्थितीत उपतहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांनी निवेदन स्वीकारले.

कर्नाटक सरकारने खानापूर तालुका आणि बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून संपूर्ण शेतकऱ्यांचे बँक कर्ज माफ करावे. पावसाअभावी मोसमी पिके वाया गेली असून, पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. बेळगाव व खानापूर तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावेत, तसेच पावसाअभावी भात, ऊस, भुईमुग, मका, सोयाबीन, बटाटा आदी पावसाळी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. तर दुसरीकडे गुरांना चारा मिळावा यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकरी पिके घेऊ शकत नाहीत. शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले असल्याने बँकांकडून घेतलेले कर्ज फेडणे शेतकऱ्यांना शक्य नाही नाही. आणि शेतकर्‍यांना कर्ज फेडण्यास बँकांनी सक्ती केली तर, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांची मालिका सुरू होईल. यासाठी सरकारने शेतकऱ्यांचे बँकेचे संपूर्ण कर्ज माफ करावेत. असा इशारा सरकारला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

येत्या आठ दिवसात आमच्या निवेदनाची दखल सरकारने घेतली पाहिजे, अन्यथा बेळगाव-ताळगुप्पा राज्य महामार्गावर कक्केरी गावात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे. आंदोलना दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नयेत यासाठी आंदोलना दिवशी अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशीही विनंती करण्यात आली आहे.

यावेळी संघटनेचे नेते अशोक यमकनमर्डी, प्रकाश नाईक, किशोर मिठारी यांची भाषणे झाली.

यावेळी प्रकाश नाईक म्हणाले, खानापूर तालुका जंगल भागात वसलेला व अतिशय मागासलेला आहे. त्यासाठी गणेबैल येथील टोल नाक्यावर खानापूर तालुक्यातील नागरिकांच्या कडून टोल आकारणी करू नयेत, तसेच राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी खानापूर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्षयल्लाप्पा चन्नापुर, शेतकरी नेते अशोक यमकनमर्डी, शेतकरी नेते प्रकाश नाईक, गुरुलिंगय्या हिरेमठ, शिवाजी अंबडगट्टी, कृष्णा बाळ्ळन्नावर, सेबसिन सोज, निंगाप्पा संबरगी, किशोर मिठारी, पुंडलिक उल्लागड्डी, यल्लाप्पा गुप्ता, मंजुनाथ पाटील, मंजूनाथ पाटील, निंगाप्पा सांबरगी, रमेश वीरपूर, मंजुनाथ अंबडगट्टी, मारुती हुडेद, इरय्या हिरेमठ, बसनगौडा पाटील, यल्लाप्पा नांदुरकर, बसवराज बिदरगट्टी तसेच तालुका शेतकरी संघटनेचे नेते व विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचा लिंटल भरणी कार्यक्रम संपन्न

Spread the love  खानापूर : मणतुर्गे तालुका खानापूर येथील श्री रवळनाथ मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यासाठी १४/०९/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *